सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केलेत. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल झालेत. देशातील महानगरांमध्ये मात्र पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर मे 2022 मध्ये बदलले होते, मात्र तेव्हापासून दर स्थिरच आहेत. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरनं विकलंय जातंय. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे. भारतात सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जातंय. श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 113.30 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय.