आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार पाहायला मिळताहेत.

WTI कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून प्रति बॅरल 82.50 डॉलरवर व्यापार करत आहे.

ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतीत घसरण नोंदवली गेली असून प्रति बॅरल 86.47 डॉलरवर आहे.

भारतातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केलेत.

अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल झालाय.

काही ठिकाणी पेट्रोल स्वस्त दरात मिळतंय तर काही ठिकाणी महाग झालंय.

देशातील महानगरांमध्ये मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

देशाची राजधानी नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर आहे.