आज शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. या दरम्यान सेन्सेक्स (Sensex) 600 अंकांनी खाली आलीये. निफ्टीतही (Nifty) घसरण झाली असून 195 अंकानी घसरण झालीये. शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार बंद होते शुक्रवारी शेअर बाजारात कोणतेही व्यवहार झाले नव्हते. शुक्रवारी शेअर बाजारात कोणतेही व्यवहार झाले नव्हते. इन्फोसिसचे शेअर्स गडगडल्यामुळे स्टॉक 10 टक्क्यांनी घसरला. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये मोठी घसरण होत आहे. SGX निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली असून इंडेक्स 17800 च्या खाली व्यवहार करत आहे. आशियाई बाजारांमध्ये निक्केई आणि कोस्पी देखील लाल चिन्हानं व्यवहार करत आहेत. त्याचप्रमाणे DOW, Nasdaq आणि S&P देखील यूएस फ्युचर्स मार्केटमध्ये व्यवहार करत आहेत.