भारतात पेट्रोल-डिझेलचे दर दररोज जारी केले जातात.

आज मंगळवार 25 एप्रिल 2023 रोजी अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलल्या आहेत.

मात्र, देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतींत घसरण नोंदवण्यात आलीये.

WTI क्रूड ऑईलच्या किमतीत 0.09 टक्क्यांची किंचित घट नोंदवली असून प्रति बॅरल 78.69 डॉलरवर व्यापार करत आहे.

ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 0.11 टक्क्यांनी घसरली असून प्रति बॅरल 82.64 डॉलरवर व्यापार करत आहे.

यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर मे 2022 मध्ये बदलले होते.

त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 9.5 आणि 7 रुपयांनी कमी झाले होते.

जुलै 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 5 आणि 3 रुपये प्रति लिटर कपात केली होती.

त्यानंतर महाराष्ट्रातील दर आणखी घटले होते.

तेव्हापासून मात्र राज्यातही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.