भारतात पेट्रोल-डिझेलचे दर दररोज जारी केले जातात. आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलल्या आहेत. मात्र, देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकलं जातंय. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर मे 2022 मध्ये बदलले होते. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 9.5 आणि 7 रुपयांनी कमी झाले होते. जुलै 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 5 आणि 3 रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील दर आणखी घटले होते. तेव्हापासून मात्र राज्यातही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.