आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत पुन्हा एकदा उसळी. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईल प्रति बॅरल 86 डॉलरच्या पार. भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र स्थिर. अनेक दिवसांपासून देशभरात तेलाच्या किमती स्थिरच. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये, प्रति लिटर 84.10 रुपये. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे 2022 पासून आतापर्यंत स्थिरच.