दारू आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते, पण असे असूनही भारतात दारू पिणाऱ्यांची कमी नाही.



भारतात दरवर्षी दारू पिणाऱ्या लोकांची आकडेवारी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. दारु पिण्याचे तोटे माहित असूनही लोकांचा दारू पिण्याचा मोह आणि सवय काही सुटत नाही.



दारुचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे. बीयर, रम, व्हिस्की पिणाऱ्यांचं प्रमाण काही कमी नाही.



दरम्यान, भारतातील मद्यपींची आवडती दारु कोणती हे तुम्हाला माहित आहे का?



भारतीय मद्यपींना बीअर किंवा रम नाही तर स्कॉच व्हिस्कीनं भूरळ घातली आहे. भारतात स्कॉच व्हिस्की पिणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती अहवालात समोर आली आहे.



स्कॉच व्हिस्की पिण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर आहेत. इतकंच नाही तर भारतीयांनी याबाबतील जगातील सर्व देशांना मागे टाकलं आहे



2022 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरात भारतात स्कॉच व्हिस्कीच्या एकूण 219 दशलक्ष बाटल्यांचा खप झाला.



2021 मध्ये भारतात स्कॉच व्हिस्कीच्या एकूण 136 बाटल्यांचा खप झाला होता.



जगभरातून निर्यात होणाऱ्या स्कॉच व्हिस्कीच्या बाबतीत भारताचा क्रमांक पहिला आहे.



उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार, सर्वाधिक दारू पिणाऱ्या राज्यांमध्ये छत्तीसगडचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. छत्तीसगडमधील 35.6 टक्के लोक दारूचं सेवन करतात.