महान फुटबॉलर ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू पेले यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे

मागील काही महिने ते कर्करोगाशी लढा देत होते, पण गेले काही दिवस त्यांची अवस्था बिकट झाली होती.

ज्यानंतर अखेर आता त्याचं निधन झालं आहे.

ज्यानंतर अखेर आता त्याचं निधन झालं आहे.

पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

काही दिवसांपासून पेले यांचे कुटुंबिय साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात जमा झाले होते.

या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट मानलं जात होतं.

त्यांना अगदी फुटबॉलचा देवही म्हटलं जायचं. ते फुटबॉल कारकिर्दीत फॉरवर्ड म्हणून खेळत असंत, त्यांना सर्वकालिन महान फुटबॉलपटू असंही म्हटलं जातं.

फिफानेही पेले यांना महान खेळाडूचं लेबल दिलं होतं. ते त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी फुटबॉलपटू मानले जात होते.

कारण त्यांनी एक-दोन नाही तर तीन वेळा विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यांच्यामुळेच ब्राझील हा सर्वात यशस्वी फुटबॉल संघ म्हणून जगासमोर आला.