शेंगदाण्यांच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स आढळतात, आपल्या शरीरातील पेशी निरोगी ठेवण्यासाठी ते महत्त्वाचे आहे.

शाकाहारी लोकांसाठी शेंगदाणा हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे.

शेंगदाण्यातील फायबरमुळे पचनसंस्थेस सूज, दाह यासारख्या विकारांचा धोका कमी होतो.

शेंगदाणे खाल्यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका टळतो.

शेंगदाणे खाणे हे त्वचेसाठी उत्तम मानले जातात, त्वचा मुलायम आणि तजेलदार होते.

शेंगदाण्यामध्ये फॉलिक अ‍ॅसिडच मुबलक असते ते प्रेग्नन्सीमधील महत्वाचा घटक आहे म्हणून शेंगदाणे दररोज खाणे गर्भवती स्त्रियांसाठी खूप चांगले असते.

शेंगदाण्यामुळे कॉलेस्टेरॉल नियंत्रित राहते.

शेंगदाण्यात असणाऱ्या फॉलिक अ‍ॅसिडमुळे हृदयातील रक्तवाहिन्यांचे दोष कमी होतात.

शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात फॅट आणि कॅलरीज असूनही वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे खूप उपयुक्त ठरतात

शेंगदाण्यात कर्बोदके कमी असल्याने शेंगदाणे हे मधुमेही रुग्णांसाठी योग्य असतात.