रोजच्या कामाच्या व्यापात स्वत:कडे लक्ष देणे राहून जाते आणि मग सगळे कंटाळवाणे वाटायला लागते काय आहेत याची कारणं पाहूयात अनेकदा रोजच्या त्याच त्याच दिनचर्येमुळे आयुष्य कंटाळवाणे होते जेव्हा आपल्याला कोणत्याही कामात समाधान वाटत नाही तेव्हा आपल्याला कंटाळा येतो काही लोकांची समस्या अशी असते की त्यांना कोणत्याही कामाचा लगेच कंटाळा येतो जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही सवयी सोडल्या तर तुम्हाला कंटाळवाणे वाटणार नाही जेव्हा एखादे काम पूर्ण करूनही तुम्हाला आतून समाधान वाटत नाही,तेव्हा त्या कामाचा कंटाळा येऊ लागतो पण तेच काम आपण फार मनापासून केलं तर मात्र तुम्हाला मजा येऊ लागते तुम्ही व्यायाम करा,काही तास स्वतःवर लक्ष केंद्रित करा यामुळे तुमच्या आत ऊर्जा वाढेल आणि तुम्हाला बरे वाटेल