ट्रेनने, बसने प्रवास करताना अनेकजण आपल्या अवतीभोवती टाईमपास म्हणून शेंगदाणे खाताना अगदी सहज दिसतात.



शेंगदाण्याचा टाईमपास म्हणून जरी चघळण्यासाठी वापर केला जात असला तरी मात्र शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रथिने आणि जीवनसत्त्वे आढळतात.



शेंगदाण्यामध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडेंट असते जे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.



शेंगदाण्यामध्ये बदामाइतकेच पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते.



एक निरोगी व्यक्ती एका दिवसात 40 ग्रॅम म्हणजे सुमारे मूठभर शेंगदाणे खाऊ शकतो. हे चरबी आणि कोलेस्टेरॉल या दोन्हीचे पातळी कमी करू शकते.



टाईप टू डायबिटीजने ग्रस्त असलेले लोक शेंगदाणे खाऊ शकतात. शेंगदाण्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.



हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे आपली त्वचा कोरडी होऊ लागते. अशा परिस्थितीत शेंगदाण्याचे सेवन करून त्वचेला कोरडेपणापासून वाचवता येते.



शेंगदाण्यात मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि फायबर आढळतात जे थंडीत हाडे मजबूत करतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.