आपलं वाढतं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करताना दिसतात.



बरेच जण विशेष प्रकारच्या आहाराचे पालन करतात. असे केल्याने वजन कमी होण्यास मदत होईल, असे त्यांना वाटते.



वजन कमी करण्याची अशीच एक पद्धत म्हणजे ग्रीन टी.



ग्रीन टीमध्ये दोन गोष्टी आढळतात. कॅफिन आणि कॅटेचिन. याचा तुमच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो.



ग्रीन टी चा काही प्रमाणात फायदा होतो. ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल, कॅफीन आणि आयरन असतात जे अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात.



पण, जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने शरीराला हानी पोहोचते. असे केल्याने फायद्याऐवजी तोटाही होऊ शकतो.



ग्रीन टी पिणे फायदेशीर आहे. मात्र दिवसातून एक किंवा दोन कप प्यायलात तरच ते तुमच्यासाठी चांगले आहे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.