आभाळ भरुन आलेलं मोराने पाहिलं आणि लगेच फुलवला पिसारा.



हे दृश्य पाहताच 'नाच रे मोरा नाच' हे गाणं आपोआप ओठांवर आलं.



कोल्हापुरातील वनराई रेसिडेन्सी परिसरात आज सकाळी हे मनोहरी दृश्य पाहायला मिळालं.



अथर्व समीर देशपांडे या युवकाने आपल्या मोबाईलमध्ये नाचणारा मोर कैद केला



पिसारा फुलवून नाचणारा मोर बघणं म्हणजे विलक्षण बाब असते.



रंगीत पिसारा आणि डौलदार मानेमुळे मोराने पैठणी या महावस्त्रावर मानाचं स्थान मिळवलं आहे.



भारत सरकारने 26 जानेवारी 1963 रोजी मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलं



मोराची लांबी साधारण 100 ते 125 सेमीपर्यंत तर पिसारा 195 ते 255 सेमी लांब असू शकतो.



मोरांना कधीही पाहिलं तरी मनाला प्रसन्नता मिळते.