इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे.



न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो पाठोपाठ विक्रमांचं शिखर गाठत आहे.



नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात नुकतंच त्यानं भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.



हा पराक्रम करून काही तास उलटले नाहीत, तोच त्यानं भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या विक्रम मोडलाय.



जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तेरावा क्रिकेटपटू ठरलाय.



न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत जो रूटनं कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठला.



दोन सामन्यांत दोन शतके झळकावत जो रूटनं आता युनूस खाननंतर सुनील गावस्करला मागं टाकलं आहे.