अभिनेता शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 22 दिवस झाले आहेत.



पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.



पठाण या चित्रपटानं भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.



आता पठाण हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.



पठाण हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानंतर आता यशराज फिल्म्सनं या चित्रटाच्या तिकीटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.



'पठाण'ने रिलीज झाल्यानंतर 22 व्या दिवशी 3.50 कोटींची कमाई केली आहे.



चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 502.35 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.



पठाण हा वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये 1000 कोटींचा टप्पा पार करेल, असं देखील म्हटलं जात आहे.



आता शुक्रवारी (17 फेब्रुवारी) पठाण हा चित्रपट प्रेक्षकांना 110 रुपयांमध्ये बघता येणार आहे.



पठाण चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.