अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
शाहरुखच्या पठाण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स तोडले.
शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे.
आता आस्क एस आर के (#AskSRK) हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत.
चाहत्यांच्या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे.
शाहरुखच्या एका चाहत्यानं ट्विटरवर त्याला विचारलं,'जेवणं केलं का सर?' यावर शाहरुखनं उत्तर दिलं, 'नाही सध्या पोट भरलेलंच असतं'
दुसऱ्या युझरनं शाहरुखला विचारलं, 'सर तुमचे एब्स अजूनही आहेत की बटर चिकननं दाबून टाकले.' चाहत्याच्या या मजेशीर प्रश्नाला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'टायगर ऑफ असं म्हणतो, 'दुसरो के आते नहीं मेरे जाते नहीं'
शाहरुखच्या एका चाहत्यानं ट्वीट करत लिहिलं, 'सर, यावेळी रिप्लाय नाही दिला तर तुम्हाला फॅन-2 तयार करावा लागेल.' या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'जे काय करायचंय ते कर,मी फॅन-2 नाही बनवणार.'
एका ट्विटर युझरनं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन लिहिलं, 'सर, अबराम हा सेटवर काय करत होते. तो पठाण या चित्रपटाचा असिस्टंट डायरेक्टर आहे का?' या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'नाही तो स्टायलिस्ट होता.'
पठाण चित्रपट हा आदित्य चोप्राच्या स्पाय युनिव्हर्समधील एक चित्रपट आहे.