अभिनेता ऋषभ शेट्टीनं त्याच्या कांतारा या चित्रपटामधील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. कांतारा या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील ऋषभनं केलं. कांतारा या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता ऋषभ शेट्टीला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे CEO अभिषेक मिश्रा यांनी एका पत्राद्वारके ही माहिती दिली आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा हा 20 फेब्रुवारीला पार पडणार आहे. कांतारा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. कांतारा या चित्रपटामध्ये ऋषभबरोबरच अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. कांतारा चित्रपटामुळे ऋषभ शेट्टीला विशेष लोकप्रियता मिळाली. कांतारामधील सप्तमी आणि ऋषभच्या रोमँटिक अंदाजाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.