अॅक्शन, ड्रामा आणि सस्पेन्सनं सजलेला पठाण हा चित्रपट गेल्या काही दिवसापासून भारतातीलच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पठाण या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिनेता शाहरुख खानच्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. आता पठाण या चित्रपटानं 'व्हॅलेंटाईन-डे' ला (14 फेब्रुवारी) कोट्यवधींची कमाई केली. जाणून घ्या 21 व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 21व्या दिवशी म्हणजेच, मंगळवारी (14 फेब्रुवारी) पठाण या चित्रपटानं 5.65 कोटींची कमाई केली आहे. पठाण या चित्रपटाची एकूण कमाई 498.90 एवढी झाली आहे. 500 कोटींच्या क्लबमध्ये हा चित्रपट सामील होईल का? या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच शाहरुखच्या चाहत्यांना मिळेल. जगभरातही पठाण या चित्रपटाची कमाई 1000 कोटींचा टप्पा गाठेल, असं म्हटलं जात आहे. पठाण चित्रपट हा आदित्य चोप्राच्या स्पाय युनिव्हर्समधील एक चित्रपट आहे.