शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. रिलीज आधीच या चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमधून कोट्यवधींची कमाई केली होती. हा चित्रपट रिलीज होऊन 12 दिवस झाले आहे. रमेश बाला यांनी ट्वीट शेअर करुन पठाणच्या कलेक्शनची माहिती दिली आहे. पठाण या चित्रपटानं भारतात रविवारी (5 फेब्रुवारी) बॉक्स ऑफिसवर 28 कोटींची कमाई केली. जगभरात या चित्रपटानं जवळपास 850 कोटींची कमाई केली आहे. केवळ 12 दिवसात पठाणनं 850 कोटींची कमाई केल्यानं आता शाहरुखचे चाहते त्याचं कौतुक करत आहेत. पठाण चित्रपटानं भारतात जवळपास 415 कोटींची कमाई केली आहे. पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. पठाण या चित्रपटामधील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.