बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर म्हणजे, तरुणांच्या गळ्यातील ताईत. श्रद्धाच्या क्लासी अदांनी लाखो चाहते घायाळ होतात. श्रद्धा आपल्या लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी श्रद्धानं आपला लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केलाय. या फोटोंमध्ये ती पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसून येतेय. त्यासोबतच श्रद्धानं पिंक कलरचा ब्लेझरही वेअर केलाय. श्रद्धाकडून इंस्पिरेशन घेऊन तुम्ही ऑफिसला जाताना हा लूक कॅरी करु शकता. एखादी मिटिंग अटेंड करण्यासाठीही श्रद्धाचा हा लूक तुम्ही फॉलो करु शकता. आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये श्रद्धानं वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रद्धाचा सोज्वळ आणि क्लासी अंदाज चाहत्यांना खूप आवडतो. एथनिक लूक असो वा बोल्ड, श्रद्धाचा प्रत्येक लूक तितकाच क्लासी असतो. (सर्व फोटो : @shraddhakapoor/Instagram)