'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते. अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये तिचा पारंपारिक अंदाज पाहायला मिळत आहे. अभिनेत्री श्रिया सरनच्या या स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ती कोणताही लूक उत्तमरित्या कॅरी करते. नवीन फोटोंमध्ये श्रिया ट्रेडिशनल लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. पीच कलरची साडी आणि फुल स्लीव्ह ब्लाऊज असा तिचा लूक आहे. श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते. श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते. अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे. नुकतीच श्रिया सरन 'दृश्यम 2' या चित्रपटात झळकली आहे. श्रिया, अजय देवगण आणि तबू अशी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने मोठा गल्ला कमावला आहे. 'शिवाजी द बॉस' या 2007 साली आलेल्या अभिनेता रजनीकांत यांच्या चित्रपटात झळकल्यामुळे तिला खरी ओळख मिळाली. श्रिया सरन अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या तुझे मेरी कसम चित्रपटात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. बॉलिवूड चित्रपट 'दृश्यम'मध्ये श्रिया सरनने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली होती.