सनी देओलचा गदर-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गदर-2 साठी सनी देओलनं 5 कोटी एवढं मानधन घेतलं आहे. गदर या चित्रपटामध्ये अभिनेत्री अमीषा पटेलनं सकीना ही भूमिका साकारली होती. आता गदर-2 मध्ये देखील ती ही भूमिका साकारणार आहे. गदर-2 साठी अमीषानं 2 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. अभिनेता गौरव चोप्रा देखील गदर-2 मध्ये काम करणार आहे. त्यानं या चित्रपटासाठी 25 लाख एवढं मानधन घेतलं आहे. अभिनेता लव्ह सिन्हा हा गदर-2 मध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. त्यानं या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 60 लाख एवढे मानधन घेतलं आहे. अभिनेता मनीष वाधवानं गदर-2 साठी 60 लाख एवढी फी घेतली आहे. उत्कर्ष शर्मानं गदरः2 या चित्रपटामध्ये तारा सिंहच्या मुलाची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी त्यानं एक कोटी एवढं मानधन घेतलं आहे. गदर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.