‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परीचा अर्थात बालकलाकार मायरा वायकूळचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अवघ्या पाच वर्षांच्या परीने मालिका सुरू होताच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मालिकेचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढण्याचे कारण म्हणजे मालिकेतील बालकलाकार 'परी' आहे. परीचे खरे नाव मायरा वायकूळ असे आहे. मायरा सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते, तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अर्थात चिमुकल्या परीचे व्हिडीओ आणि फोटो तिचे आई-बाबा सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या मायरा नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या नऊ रंगांचा ट्रेंड फॉलो करत आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही क्युट फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. मायराचा क्युटनेस पाहून चाहते देखील तिचे कौतुक करताना थकत नाहीयेत. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अवघ्या पाच वर्षांच्या परीने मालिका सुरू होताच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.