छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील अंतरा-मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण हिने ‘अंतरा’ हे पात्र साकारले आहे. छोट्या पडद्यावर साधी-भोळी ‘रिक्षावाली’ साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील ‘अंतरा’चा ग्लॅमरस अवतार पाहून चाहतेही ‘जीव माझा गुंतला...’ म्हणत आहेत. ‘जीव माझा गुंतला...’ या मालिकेची सध्या छोट्या पडद्यावर हवा आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. योगिता चव्हाण हिने तिचे सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. लवकरच योगिता एका नव्याकोऱ्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.