मालिकाच नव्हे तर चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. मालिकाच नव्हे तर चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या प्राजक्ता माळी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये आहे. या लंडन शूटिंगदरम्यान प्राजक्ता आपल्या सहकलाकारांसोबत भटकंतीचा आनंद देखील घेत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून जिचे नाव घेतले जाते, अशी नायिका म्हणजे प्राजक्ता माळी. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताला भटकंतीची देखील आवड आहे. नुकतेच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ता सध्या लंडनमध्ये आहे. चाहत्यांना आणि प्रेक्षकांना तिने आपल्या लंडन सफरीची झलकही सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवली आहे.