छोट्या पडद्यावर अभिनेत्री श्वेता तिवारी चांगलीच लोकप्रिय आहे. श्वेताने छोट्या पडद्यावर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबत श्वेताच्या फिटनेस आणि सौंदर्याचे कौतुक होत असते. ट्रेडिशनल आणि वेस्टर्न आऊटफिटमध्ये ती सुंदर दिसते. तिने लवेंडर कलरमधील चिकनकारी कुर्ता सूटमधील फोटो शेअर केले आहेत. या ट्रेडिशनल लूकमध्ये श्वेताचं सुंदर दिसत होती. चिकनकारी कुर्ता सूटवर फोटोशूट करताना श्वेताने हलकासा मेकअप केला होता. या फोटोशूटमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसत होते. श्वेता तिवारी 'अपराजिता' या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेत ती दोन मुलींच्या आईची भूमिका साकारत आहे