सिंगल यूज प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत.



आता कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जा, कोणतेही पेय पिण्यासाठी तुम्हाला कागदाचा स्ट्रॉ दिला जातो.



पॅकेज केलेल्या पेयांमध्येही प्लॅस्टिकऐवजी कागदाच्या स्ट्रॉचा वापर केला जात आहे. सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी हे एक चांगले पाऊल मानले जात आहे.



पण, पेपर स्ट्रॉ बनवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर केला जात असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.



स्काय न्यूजनुसार, बेल्जियमच्या काही संशोधकांनी काढलेल्या अहवालात म्हटलं आहे की, पेपर स्ट्रॉसह कोणतंही पेय पिणं हानिकारक ठरू शकते.



या अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, कागदाच्या स्ट्रॉमध्ये काही विषारी रसायने असतात, ही माणसांसाठी धोकादायक असतात.



संशोधनात कागद आणि बांबूपासून बनवलेल्या पेपर स्ट्रॉमध्ये पॉलीआणि परफ्लुरोआल्काइल पदार्थ (पीएफएएस) आढळून आलं.



हे हानिकारक पदार्थ तुमच्या शरीरात दीर्घकाळ टिकतात आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहेत.



या रसायनामुळे थायरॉईड, कोलेस्ट्रॉल वाढणे, यकृताचा त्रास, किडनीचा कर्करोग, जन्माचे वजन कमी, लसींचा कमी परिणाम अशा समस्या उद्भवू शकतात.



या अभ्यासानुसार, कोणत्याही स्टीलच्या स्ट्रॉमध्ये पीएफएएस आढळलं नाही आणि ते सुरक्षित आहेत.



दरम्यान, कागदी स्ट्रॉमध्ये मोठ्या प्रमाणात पीएफएएसची आढळून आलं आहे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.