परंतु, पनीरचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. हृदय तंदुरुस्त ठेवायचे असेल आणि कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित करायचे असेल तर पनीरचे सेवन कमी करा. पनीरचे जास्त सेवन केल्याने शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते. ज्यांना अॅसिडीटीचा त्रास आहे, त्यांनी कमीतकमी पनीर खावे. पनीर प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. परंतु, शरीरात जास्त प्रमाणात प्रोटीनमुळे अतिसार होऊ शकतो. कच्चा पनीर खाणे देखील बर्याच लोकांना आवडते. परंतु, ही चांगली सवय नाही. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.