शाहिद कपूरचा आगामी 'जर्सी' सिनेमा 22 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याच निमित्ताने शाहिद कपूर कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो' मध्ये पोहोचला. जर्सी चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट यावेळी 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसणार आहे. शाहिद कपूरच्या क्रिकेटसाठीच्या संघर्षावर 'जर्सी' सिनेमा भाष्य करणारा आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर 'जर्सी' सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. शाहिद आणि मृणाल पहिल्यांदाच या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केले आहे.