माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त पंढरपूर विठ्ठल मंदिरास द्राक्षांची आरस एक हजार किलो द्राक्षे सजावटीसाठी विठ्ठल मंदिरात आणली मंदिर समितीचे कर्मचारी रघु शिंदे यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने मंदिरात द्राक्षांची सजावट केली. विठ्ठल गाभारा , रुक्मिणी माता गाभारा , चौखांबी , सोळखांबी या ठिकाणी द्राक्षे आणि त्याच्या पानांची आकर्षक सजावट केली देवाला अर्पण केलेले दान गुप्त असावे असे म्हणत या शेतकरी भक्ताने नाव जाहीर नाही केले विठ्ठल रुक्मिणी या द्राक्षांच्या बागेत असल्याचे आभास भाविकांना मिळाला. सध्या आपल्या बागेत पिकलेली द्राक्षे देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी अनेक भाविक येतात. सजावटीमुळे विठुरायाचे रुप खुलले आहे