पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पोतेभर खोटे दागिने अर्पण झाले आहेत.
ज्या भाविकांना सोन्या चांदीचे दागिने अर्पण करणे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार शक्य होत नाही ते नवस फेडायला खोटे दागिने देवाला अर्पण करतात.
पंढरपूरचा विठूराया तसा नवसाचा देव कधीच नाही मात्र तरीही देशभरातील भाविक
देवाला आपल्या इच्छा साकडे घालतात आणि देव त्यांच्या इच्छांची पूर्तता देखील करतो.
अशावेळी हे भाविक (Devotee) देवाला बोललेले नवस मंदिरात येऊन पूर्ण करतात.
विठुराया हा गोरगरीब भाविकांचा देव असल्याने कधी देवाला पाळणे, कानातले, नाकातले
असे लहान लहान सोन्या-चांदीचे दागिने देवाच्या दानपेटीत अर्पण करत असतात.
खऱ्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पोतेभरुन खोटे दागिने अर्पण!
दर महिन्याला दानपेटी मोजण्यासाठी उघडल्यावर यात नोटांसोबत असे दागिने देखील सापडतात.
जे खोटे दागिने असतात तेही जपून पोत्यामध्ये भरुन ठेवले जातात.
सध्या देवाच्या खजिन्यात खऱ्या चोख दागिन्यांसोबत असे पोतेभरुन खोटे दागिने देखील जमा झाले आहेत.