पंढरपूरच्या विठूरायाकडे भाविक साकडे घालतात आणि देव त्यांच्या इच्छांची पूर्तता देखील करतो.

अशावेळी हे भाविक देवाला बोललेले नवस मंदिरात येऊन पूर्ण करतात.

गोरगरीब भाविक कानातले, नाकातले असे लहान लहान सोन्या-चांदीचे दागिने देवाच्या दानपेटीत अर्पण करतात.

तर आर्थिक परिस्थितीनुसार शक्य होत नाही ते भाविक नवस फेडायला खोटे दागिने देवाला अर्पण करतात.

काही भाविकांना खरे दागिने म्हणून खोटे दागिने विकून सराफ त्यांची फसवणूक देखील करतात.

दर महिन्याला दानपेटी उघडल्यावर यात नोटांसोबत असे दागिने देखील सापडतात.

विठ्ठल मंदिराचे सराफ या दागिन्यांची तपासणी करतात आणि खऱ्या दागिन्यांची नोंद करुन बाजूला ठेवतात

जे खोटे दागिने असतात तेही जपून पोत्यामध्ये भरुन ठेवले जातात.

सध्या देवाच्या खजिन्यात खऱ्या चोख दागिन्यांसोबत असे पोतेभरुन खोटे दागिने देखील जमा झाले आहेत.