बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छल आणि म्युझिक कंपोजर मिथुन शर्मा यांचा विवाह सोहळा पार पडला.
मुंबईमध्ये पलक आणि मिथुन यांचा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
शनिवारी (5 नोव्हेंबर) पलक आणि मिथुन यांचा हळद, मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला होता.
पलकच्या हळद आणि संगीत सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले.
पलकनं तिच्या ब्रायडल लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मिथुनसोबतचे हे फोटो शेअर करुन पलकनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आज आम्ही दोघे एक झालो आहोत.'
पलकनं शेअर केलेल्या या फोटोला गायक शान गायिका अदिती सिंह शर्मा आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार यांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
पलकनं 2012 साली प्रदर्शित झालेल्या एक था टायगर या चित्रपटामधील तसेच आशिकी 2, किक, एक्शन जॅक्सन ,प्रेम रतन धन पायो, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील गाणी गायली आहेत.
पलक मुच्छलचा जन्म 30 मार्च 1992 रोजी इंदूर येथे झाला.