दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांचा आज वाढदिवस आहे.

कमल यांनी 1959 साली वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.

त्यांच्या अनेक सिनेमांनी चाहत्यांना वेड लावलं आहे.

'अपूर्व रागंगल' या सिनेमाने कमल हासनला खरा ब्रेक मिळाला.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह कमल हासन यांनी बॉलिवूडमध्येदेखील स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे.

एक दुजे के लिए' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

त्यांना पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.

कमल हासन एक उत्तम अभिनेता असण्यासोबत त्यांनी राजकारणातदेखील पाऊल ठेवले आहे.

सिनेमांसह कमल हासन त्यांच्या अफेअरमुळे कायमच चर्चेत होते.

कमल हासन सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत.