'कांतारा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
ऋषभ शेट्टी यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं.
आता कांताराच्या यशानंतर कांताराचा दुसरा पार्ट देखील रिलीज केला जाईल का? असा प्रश्न ऋषभ शेट्टीला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला.
ऋषभ शेट्टीनं कांतारा-2 या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.
तो म्हणाला, 'मला याबद्दल आता काहीही सांगता येणार नाही. मी आता दोन महिन्यांचा ब्रेक घेणार आहे.'
पुढे तो म्हणाला, 'कांताराला रिलीज होऊन 35 दिवस झाले आहे आणि अजूनही आम्ही या चित्रपटाचं प्रमोशन करत आहोत. त्यामुळे मी सध्या केवळ कांताराबाबत बोलू शकतो. कांतारा2 बद्दल बोलू शकत नाही.'
कांतारा हिंदी रिमेकबाबत ऋषभ शेट्टी म्हणाला, 'मला या चित्रपटाचा हिंदी रिमेक व्हावा असं वाटत नाही.'
'कांतारा'मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत.