बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवननं त्याच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे.
वरुणनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, तो वेस्टिब्युलर हायपोफंक्शन या आजाराचा सामना करत आहे.
'मी स्वत:वर खूप कामाचा दबाव निर्माण केला होता, ज्याचा मला त्रास होत आहे. यामुळेच मला वेस्टिब्युलर हायपोफंक्शनचा त्रास होत आहे.' असं त्यानं मुलाखतीमध्ये सांगितलं.
वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा एक असा आजार आहे ज्यामध्ये मेंदूला संदेश पाठववणारा कानाचा भाग व्यवस्थित काम करत नाही.
खराब रक्ताभिसरण, संसर्ग, कानात कॅल्शियमचा अपव्यय यांमुळे वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा आजार होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी वरुणचा जुग जुग जियो हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.
आता त्याचा भेडीया हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
भेडीया या चित्रपटात वरुणसोबत क्रिती सेनन देखील प्रमुख साकारणार आहे.
भेडीया हा चित्रपट 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
वरुणच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.