आरोग्य तज्ज्ञांच्या मते, छातीत दुखणे हे हृदयाच्या अडथळ्याचे एक सामान्य लक्षण आहे परंतु याशिवाय शरीरात इतर ठिकाणीही वेदना जाणवू शकतात. खांद्याच्या डाव्या आणि उजव्या हातात वेदना ओटीपोटात दुखणे, मानेत आणि छातीत कळा येणे यांसारखी जर कोणती लक्षणं दिसली की हृदयात काहीतरी गडबड सुरु आहे. छाती, खांदा, कंबर कुठेही हृदयदुखीचा त्रास होऊ शकतो जर पाठदुखी असेल आणि श्वासोच्छवासाचा त्रास, थकवा आणि घाम येत असेल तर ते कार्डिएक अरेस्टचे लक्षण असू शकते हृदयविकाराचा झटका कोणत्याही स्त्री-पुरुषाला येऊ शकतो कोणत्याही वयात होऊ शकतो आणि कधीही होऊ शकतो अशा स्थितीत पाठदुखीचा त्रास होत असताना महिलांनी सतर्क राहण्याची गरज आहे. त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.