मिर्झापूरफेम गोलू म्हणजेच श्वेता त्रिपाठी सोशल मीडियावर सक्रिय असते. अलीकडे श्वेता तिच्या शिक्षणाने चर्चेत आली आहे. मिर्झापूर वेबसीरीजमधून श्वेताला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. श्वेता त्रिपाठीचा जन्म 6 जुलै 1985 रोजी झाला. श्वेताने नॅशनल इन्सीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलाजी मधून फॅशन कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली. श्वेताने 2009 मध्ये टीव्हीच्या मस्त हे लाईफमधून डेब्यू केला. श्वेताने 2015 मध्ये मसान चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्वेताने काही मॅग्जीनमध्ये काम केले. अभिनेत्रीसह श्वेता एक ट्रेंड क्लासिकल डांसर देखील आहे. श्वेताने अभिनेता आणि रॅपर चैतन्य शर्मासोबत लग्न केलं आहे.