शरीरात झटपट ऊर्जा मिळावी आणि थंडावा मिळावा यासाठी थंडगार ज्यूस पिणं सर्वांना आवडतं. बाजारात उपलब्ध असलेल्या टेट्रापॅक ज्यूसपासून ते कोल्ड स्टोरेजमध्ये उपलब्ध असलेला संत्र्याचा रस नक्की पितो. संत्र्याचा रस व्हिटॅमिन-सीचा उत्तम स्त्रोत आहे आणि यामुळे शरीराला थंडावा देण्यासोबतच रोगप्रतिकारशक्तीही वाढते असे आपल्या सर्वांना वाटते. पण गुणवत्तेच्या बाबतीत संत्र्याचा रस संत्रं फळाहून अधिक काळ टिकू शकत नाही. जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही संत्र्याच्या रसापासून दूर राहावं. संत्र्याचा रस चरबी वाढवतो कारण यामध्ये भरपूर साखर असते. तसेच ज्यूस प्यायल्यावर आपण पटापट पितो. जेव्हा भरपूर साखर शरीरात जाते, तेव्हा शरीर एकाच वेळी एवढी साखर वापरू शकत नाही, म्हणून तिचे चरबीमध्ये रूपांतर करते आणि साठवते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.