अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे.



या निमित्त जेजुरी गडावर भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.



खंडेरायाची पालखी सकाळी 11 वाजता कऱ्हा स्नानासाठी जेजुरी गडावरुन रवाना झाली आहे.



संध्याकाळी चार वाजता कऱ्हा नदीच्या पवित्र पाण्याने देवाला आंघोळ घालण्यात येईल.



सोमवती अमवास्येला जेजुरीच्या खंडेरायाची मोठी यात्रा भरते.



कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनी ही यात्रा पार पडणार आहे.



चार ते पाच लाख भाविक हे जेजुरीत येणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली आहे.



या यात्रेसाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.



'यळकोट यळकोट जय मल्हार'च्या गजराने जेजुरी दुमदुमली आहे



भंडाऱ्याच्या उधळणीने कडेकपारी आसमंत भरला