पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर तिरंग्यांची रोषणाई केली आहे.
न्यूयॉर्कमधील भारतातील वाणिज्य दूतावासने ट्विट करत या रोषणाईचे फोटो शेअर केले आहेत.
तर पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी इम्पिरिअल स्टेट या इमारतीवर देखील तिरंग्याची रोषणाई करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी ते अमेरिकेतील भारतीयांच्या कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील आगमनानंतर त्यांना अमेरिकेतील सैन्याकडून गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आला
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसवर स्वागत देखील केले.
तर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक देखील घेण्यात आली.
ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
गुरुवारी (22 जून) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हाईट हाऊसवर भाषण देखील केलं.
यावेळी त्यांनी म्हटलं की, 'हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे.