भारतात आणि जगात अनेक ठिकाणी सरोवरे आहेत. यातीलच ओडिशा राज्यात चिल्का हे अतिशय मोठे सरोवर आहे



चिल्का हे भारतातील सर्वात मोठे तर जगातील दुसरे मोठे समुद्री सरोवर आहे



या सरोवराचे खास आकर्षण म्हणजे या सरोवराचे पाणी पावसाळ्यात गोडे आणि उन्हाळ्यात खारे असते.



जगभरातील पर्यटक हा सरोवर पाहण्यासाठी येत असतात.



चिल्का सरोवर कोलकाता आणि मद्रास लोहमार्गावर भुवनेश्वरपासून 89 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.



येथील वनसंपदा प्रेक्षणीय असून मासेमारीसाठी आणि पाणपक्ष्यांच्या शिकारीसाठी हे सरोवर प्रसिद्ध आहे



खास बाब म्हणजे सागरी जीवविज्ञान आणि मत्स्यसंवर्धन यांच्या अभ्यासाच्या केंद्रांसह विश्रामगृहे देखील येथे उघडण्यात आली आहेत



या सरोवरात पारिकूड आणि मालूड अशी दोन सुंदर बेटे आहेत.



या दोन बेटांशिवाय येथे अनेक निर्जन बेटे देखील आहेत



या सुंदर बेटांवर भातशेती होते. यातील काही बेटांवर लोकवस्ती देखील आहे.