देशात तब्बल 196 दिवसांनंतर म्हणजेच सुमारे सहा महिन्यांनंतक सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.



सणासुदीच्या काळात ही एक दिलासादायक बातमी आहे.



देशात गेल्या 24 तासांत 862 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



देशात सहा महिन्यांनंतर इतकी कमी रुग्णसंख्या आढळली आहे.



याआधी 12 एप्रिल 2022 रोजी 796 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर हा कोरोना रुग्णांचा आलेख सुमारे तीन लाख रुग्णांपर्यंत पोहोचला होता.



मात्र ऐन दिवाळीच्या काळात रुग्णांमध्ये मोठी घट झाल्याची बाब दिलासादायक आहे.



एकीकडे शास्त्रज्ञांकडून कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत चिंता व्यक्त होत आहे.



देशासह जगभरात कोरोनच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या नवीन तीन व्हेरियंटमुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.



जागतिक आरोग्य संघटनेनंही नव्या व्हेरियंटबद्दल धोका व्यक्त करत कोरोनाची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अशा काळात कोरोनाच्या संभाव्य पाचव्या लाटेचा धोक्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



यादरम्यान देशातील कोरोनाबाधित मात्र घटले आहेत.



देशात आज 862 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 कोटी 46 लाख 44 हजार 938 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 40 लाख 93 हजार 409 रुग्ण बरे झाले आहेत.