सध्या दिवसागणिक कोरोनाचा आलेख घसरताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 1574 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात 19 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 0.95 टक्के आहे. काल 2 हजार 208 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते आणि 12 जणांचा मृत्यू झाला होता. एका दिवसात 634 रुग्णांची घट झाली आहे. ही दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या कमी होणाऱ्या प्रादुर्भावामुळे सणांवरचे निर्बंध हटले आहेत. दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधातून मुक्त होत उत्साहात सण साजरे केले जात आहेत. एकीकडे देशातील नवीन रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळते. तर दुसरीकडे देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. देशात सध्या 18 हजार 802 सक्रिय रुग्ण आहेत. काल ही संख्या 20 हजार 821 इतकी होती. देशात नव्याने 19 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.