कोरोना विषाणूसह बदलत्या मोसमात व्हायरल फ्लूचा धोका आहे. त्यातच कोरोनाच्या नवीन XBB व्हेरियंटमुळे कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे.
जगासह देशातही कोरोनाच्या XBB व्हेरियंटच्या प्रकरणांची वाढ होत आहे. अशातच समोर आलेली एक दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना संसर्गाचा आलेख किंचित घटला आहे.
देशात कालच्या तुलनेत आज नोंद झालेल्या रुग्णांची संख्या 278 ने घटली आहे. तर मृतांच्या संख्येतही घट झाली आहे.
देशात आज 1326 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल 1604 रुग्ण आढळले होते.
गेल्या 24 तासांत आठ रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. काल कोरोनाबळींची संख्या आजच्या एवढीच म्हणजे आठ इतकी होती.
देशात गेल्या 24 तासांत एक हजार 326 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. यासोबतच कोरोनाबाधितांचा एकूण आकडा चार कोटी 46 लाख 53 हजार 592 इतका झाला आहे.
भारतात गेल्या 24 तासांत एक हजार 723 रुग्णांनी कोविड19 विषाणू संसर्गावर मात केली आहे.
आजपर्यंत 4 कोटी 41 लाख 6 हजार 656 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये कोरोला लसीकरणाचा मोठा वाटा आहे.
देशव्यापी कोरोना लसीकरणामुळे कोरोना संसर्गाचा वेग करण्यात मोठी मदत झाली आहे.
देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 219 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.