देशातील कोरोना संसर्गात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे.
भारतात गेल्या 24 तासात दोन हजार 208 नवीन रुग्ण आढळले असून 12 मृत्यूची नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या आता नवीन 1112 रुग्णांसह 4 कोटी 46 लाख 46 हजार 880 वर पोहोचला आहे.
यातील 4 कोटी 40 लाख 68 हजार 557 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.
सध्या देशात 20 हजार 821 रुग्ण कोरोना उपचाराधीन आहेत.
गेल्या 24 तासांत 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोनामृतांचा आकडा 5 लाख 28 हजार 987 वर पोहोचला आहे.
देशात गेल्या 24 तासांत 2208 रुग्णांची नोंद आणि 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 1112 नवीन कोरोनाबाधित आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.
देशव्यापी लसीकरणात भारतात आतापर्यंत 219 कोटीहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत देशात 94.94 कोटी जणांना लसीचा दुसरा डोस तर 21.76 कोटी जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
देशात लसीकरण आणि कोविड चाचण्यावर अधिक भर देण्यात येत आहे.
गेल्या 24 तासांमध्ये देशात 2 लाख 37 हजार 952 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत भारतात 89.81 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.