आपल्या शरीरात किती चरबी अर्थात फॅट जात आहे, हे अन्नातील तेलाचे प्रमाण ठरवते.
तेलाचे जास्त सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोटदुखी, पोट फुगणे, अतिसार आणि उलट्या होऊ शकतात.
जितके जास्त तेलकट पदार्थ तुम्ही खाता, तितके कॅलरीजचे प्रमाण वाढते. त्यामुळे चरबी वाढते आणि बेली फॅटची समस्या उद्भवू शकते.
तेलकट अन्नाचाही हृदयावर नकारात्मक परिणाम होतो.
यामुळे तुमचे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकते, जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
अन्नामधील जास्त तेलामुळे त्वचेवर पुरळ येतात.
तेलकट पदार्थांचा आहारात समावेश करताच मुरुमांची समस्या वाढू लागते.
तुमची त्वचा आधीच तेलकट असेल, तर तेलकट पदार्थ खाणे तुमच्यासाठी जास्त हानिकारक ठरू शकते.
जास्त तेलाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाचा धोका वाढवू शकतो.
दिवसाची सुरुवात तेलकट पदार्थाने करणे आरोग्यास खूप हानिकारक ठरू शकते.