कोरफडीत रक्तातील साखर आणि ग्लुकोज नियंत्रीत करणारे घटक असतात. जखम भरून निघण्यास कोरफडीची मदत होते. काबुली चण्यांतील घटकांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. काबुली चणे भिजत घालून त्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर कमी होते. मधुमेह टाळण्याकरता कडुनिंबाची पानं चावून खावीत. कडुनिंबाची चटणी देखील मधुमेहावर परिणामकारक आहे. आंब्याच्या पानांना पाण्यात भिजवून ते पाणी प्यावे. आंब्याच्या कोवळ्या पानांच चूर्ण दिवसातून दोन वेळा खावे. आवळा, जांभूळ आणि कारलं याची पूड करून खावी. मधुमेहावर सुकामेवा, अक्रोड, बदाम खावेत.