लिपस्टिक हा प्रत्येक मुलीच्या मेकअपचा खूप महत्त्वाचा भाग असतो. ऑफिस असो किंवा पार्टी, कुठेही जाण्यापूर्वी मुली लिपस्टिक लावायला विसरत नाहीत. लिपस्टिकमुळे लुक उठून दिसतो.

लिपस्टिकचे अनेक प्रकार आहेत, त्या लावण्याची पद्धतही वेगळ्या आहेत. सर्व महिला त्यांच्या रंग आणि लुकनुसार लिपस्टिक निवडतात.

अनेक मुलींना लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत माहित नसते. त्यामुळे कधी कधी लिपस्टिक खराब दिसते.

जेव्हाही तुम्ही लिपस्टिक लावायला सुरुवात कराल तेव्हा ती नेहमी ओठांच्या मधल्या भागातून करा. ओठ्यांच्या कडेने लिपस्टिक लावल्यावर ती पसरते.

लिपस्टिक लावताना आधी लिप बाम लावा. आपण असे केल्यास, मॅट लिपस्टिक लावणे सोपे जाते.

मॅट लिपस्टिक खूप कोरड्या असतात.त्यामुळे त्या लावल्या की त्यावर आधी टिश्यू पेपर ठेवून हलके दावावे.यामुळे ओठ फार कोरडे पडत नाहीत.

तुम्हालाही तुमची लिपस्टिक सकाळपासून संध्याकाळपर्यंत टिकून राहायची असेल, तर त्यासाठी बेस लावायला विसरू नका.

लिप लाइनर ओठांना हायलाइट करण्याचे काम करते. जर तुम्ही लिप लायनर व्यवस्थित लावले असेल तर तुमची लिपस्टिक परफेक्ट दिसेल आणि पसरणार नाही.

ओठांचा आकार चांगला दिसण्यासाठी तुम्ही फ्लॅट ब्रशच्या मदतीने ओठांभोवती कंसीलर देखील लावू शकता.

ओठांचा भाग हा नाजूक असतो. त्यामुळे आपल्या त्वचेला सूट होईल अशीच लिपस्टिक शक्यतो खरेदी करा.