नोवाक जोकोविचला मोठा धक्का



ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमधूनही बाहेर



तीन वर्षांसाठी ऑस्ट्रेलियात बंदी



फेडरल कोर्टाने लसीकरण न केलेल्या जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा सरकारी निर्णय कायम ठेवला आहे



ऑस्ट्रेलियात राहण्यासाठी शेवटची संधीही जोकोविचने गमावली आहे



नोवाक जोकोविचनं कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही



यामुळे समुदायाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असं मत मांडत ऑस्ट्रेलियाचं इमिग्रेशन मंत्री अ‍ॅलेक्स हॉल यांनी जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता



जोकोविचच्या वकिलानं सरकारच्या या निर्णयाला तर्कहीन म्हणत कोर्टामध्ये या विरूद्धात याचिका केली



मात्र व्हिसा रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवल्याने त्याला ऑस्ट्रेलियातून माघारी परतावे लागणार आहे